शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, अंबप फाट्याजवळ अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 11:16 IST

सुहास जाधव पेठवडगाव : पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडताना भरधाव कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. गणेश अनिल निकम (वय ...

सुहास जाधवपेठवडगाव : पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडताना भरधाव कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. गणेश अनिल निकम (वय -२३) असे मृत युवकाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (२१ रा. सहारा चौक, पेठवडगाव) हा गंभीर जखमी झाला. अंबप फाट्याजवळ आज, गुरुवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, येथील सहारा चौकात राहणारे गणेश व अनिल निकम हे दोघे बंधू अंबप फाट्याजवळ कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी निघाले होते. महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १० बीडब्ल्यु ४६२०) ला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही भाऊ उडून पडले. यात गणेश याच्या डोक्याला जबरी मार लागला तर वैभव गंभीर जखमी झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतुन प्राथमिक उपचार देत डॉ. वैभव कुंभार यांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण गणेश याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. चारचाकी वाहनामधील  महिला रोणीता अहुजा, अनमोल डिक्वेस्टा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णाशी उपचार सुरू आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू