गोरंबे येथील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST2021-05-15T04:24:15+5:302021-05-15T04:24:15+5:30

या अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, तुकाराम गोडसे हे आपली मोटारसायकल (क्र. एमएच- ०९ ए.ई ९५५३) वरून गोरंबे ...

One killed in an accident at Gorambe | गोरंबे येथील अपघातात एक ठार

गोरंबे येथील अपघातात एक ठार

या अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, तुकाराम गोडसे हे आपली मोटारसायकल (क्र. एमएच- ०९ ए.ई ९५५३) वरून गोरंबे गावी जात होते. गावाजवळ आले असता, पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरची (क्र. एमएच ०८ एच १७७३) ची जोरात धडक बसली. यात तुकाराम गोडसे गंभीर जखमी झाले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलाविण्यात आली. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तुकाराम गोडसे व त्यांचे थोरले बंधू सर्जेराव हे एकाच मोटारसायकलीवरून केनवडे येथे एका बँकेत आले होते. परत गावी जाताना वाटेत सर्जेराव यांचा मित्र भेटला .म्हणून ते मोटारसायकलीवरून खाली उतरले आणि तुकाराम हे पुढे निघून गेले. त्यानंतर पंधरा फुटावरच हा अपघात झाला.

Web Title: One killed in an accident at Gorambe