भक्तीपूजा नगरात टेम्पोच्या धडकेत एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:43+5:302021-02-05T07:13:43+5:30
कोल्हापूर : भक्तीपूजानगर ते यल्लमा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी सकाळी सव्वा सहा वाजता पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यास टेम्पोचालकाने ...

भक्तीपूजा नगरात टेम्पोच्या धडकेत एकजण जखमी
कोल्हापूर : भक्तीपूजानगर ते यल्लमा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी सकाळी सव्वा सहा वाजता पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यास टेम्पोचालकाने पाठीमागून धडक दिली. त्यात पादचारी गंभीर जखमी झाला. याबाबत युवराज पांडुरंग चौगुले (४०, रा. गजानन महाराज नगर, प्रमिला अपार्टमेंट) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी विठ्ठल यल्लाप्पा बुर्ली (रा. उक्कड वंटमोरी, जि.बेळगाव) या संशयितावर गुन्हा नोंद झाला.
तक्रारदार जखमी चौगुले हे रविवारी सकाळी भक्तीपूजानगरकडून यल्लामामंदिराकडे रस्त्याच्या कडेने चालत जात होते. या दरम्यान मागून आलेल्या ॲपे टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. त्यात चौगुले यांच्या दोन्ही पायांवरून टेम्पो गेला. त्यात ते गंभीर जखमी झाले. याबाबतची तक्रार स्वत: जखमी चौगुले यांनी दिल्यामुळे संशयित बुर्ली याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास राजदीप कुंभार करीत आहेत.