शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मित्राला आणायला गेला, अन् अपघातात मृत्यू झाला; महामार्गावरील दुभाजकाला मोटारसायकलची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:57 IST

पेठवडगाव- देवाळे : राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ बुलेट मोटारसायकल रस्ता दुरुस्तीसाठी लावलेल्या सिमेंट व लोखंडी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या ...

पेठवडगाव- देवाळे : राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ बुलेट मोटारसायकल रस्ता दुरुस्तीसाठी लावलेल्या सिमेंट व लोखंडी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.अविष्कार गोरख दाभाडे (वय २२, रा. काखे, ता. पन्हाळा) असे मृत युवकाचे नाव आहे, तर प्रताप गुलाब पाडवी (२० मूळ रा. जुगलखेत ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिसांत नोंद झाली नव्हती.अधिक माहिती अशी की : कोडोली येथील दाभाडे व पाडवी वर्ग मित्र आहेत. दोघेजण नर्सिंगचे शिक्षण घेत होते. पाडवी हा रात्री उशिरा कोल्हापुरात आला होता, त्याला आणण्यासाठी दाभाडे मोटारसायकलवरून गेला होता. कोल्हापूरहून परत येत असताना दाभाडे व पाडवी हे मोटारसायकल (एम एच ०९ जीएच- ४५८१) वरून वाठारच्या दिशेने चालले होते. मंगरायाचीवाडी फाट्यानजीक पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सिमेंट व लोखंडी बॅरिकेटचा रस्ता दुभाजक करण्यात आला आहे.या रस्ता दुभाजकाला जोरात धडकली. या धडकेत अविष्कार जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र प्रताप पाडवी हा गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी हवालदार रामराव पाटील, शैलेश विभूते, सतीश सुतार यांनी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून अविष्कारचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू