दिवसात एक कोटींचा घरफाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:34+5:302021-03-31T04:24:34+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जाहीर केलेल्या योजनेत मंगळवारी एका दिवसात एक कोटी चार लाख ...

दिवसात एक कोटींचा घरफाळा
कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जाहीर केलेल्या योजनेत मंगळवारी एका दिवसात एक कोटी चार लाख रुपयांचा घरफाळा जमा केला. जे थकबाकीदार घरफाळा भरणार नाहीत, त्यांच्यावर गुरुवारपासून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
थकबाकीची रक्कम एक रकमी भरणा केल्यास पन्नास टक्के सवलत योजना सुरू केली होती. त्यास प्रतिसाद देत करदात्यांनी मंगळवारी एका दिवसात ही रक्कम भरली. सवलतीचा एकच दिवस बाकी असल्यामुळे महपाालिकेच्या सर्वच नागरी सुविधा केंद्रावर नागरिकांची कर भरण्यासाठी गर्दी झाली होती. आज अखेर एकूण रुपये ५७ कोटी ९५ लाख इतका कर वसूल झाला आहे.
योजनेची मुदत बुधवारपर्यंत असल्याने तेथून पुढे सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही. शहरातील करदाता मिळकतधारकांना सवलत योजनेचा लाभ मिळण्याकरीता आज, बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार असून त्याठिकाणी कराचा भरणा करून सवलत योजनेचा लाभ घेता येईल. त्याशिवाय ज्यांना ऑनलाईन कराचा भरणा करणे शक्य आहे त्यांनी आपला कर ऑनलाईन भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
जे मिळकतधारक आपली थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या मिळकतीवर गुरुवारपासून जप्ती व मिळकतीवर बोजा नोंद करण्यासारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आले आहेत.