शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

‘केशवराव‘ला एक कोटी निधी

By admin | Updated: July 22, 2015 00:38 IST

‘स्थायी’चा निर्णय : जैव कचऱ्याच्या ठेकेदारावर फौजदारी करणार

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेतर्फे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरी बागेतील समाधिस्थळ विकसित करण्याचा ठेका बी. के. पाटील यांना देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते. केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने विशेष निधीतून १० कोटी रुपये याकामी दिले. पार्किंगसह इतर सुविधा पुरविण्यासाठी किमान तीन कोटी रुपयांची गरज आहे. राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या निधीतून या सुशोभीकरणाच्या कामासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शहरातील बगीच्यांमध्ये खेळणी बसविण्याची निविदाही यावेळी मंजूर करण्यात आली. शहरातील जैववैद्यकीय कचऱ्याचा उठाव करून त्याचे निराकरण करण्याचा ठेका ‘नेचर अ‍ॅँड नीड’ या कंपनीला देण्यात आला. महापालिकेने २०१३ मध्ये हा ठेका रद्द केला. मात्र, महापालिकेने दिलेल्या जागेला संबंधित कंपनीने मालकी नाव लावले आहे. याबाबत सिटी सर्व्हे कार्यालयास म्हणणे सादर करून फौजदारी दाखल करण्याची मागणी शारंगधर देशमुख यांनी केली. फेअरडील कंपनीने महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या न्यायालयीन कामासाठी विधितज्ज्ञांचे शुल्क अदा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. राजेंद्रनगर परिसरातील सार्वजनिक वीज बंद आहे. खांबावरील तब्बल ४० दिवे बंद अवस्थेत असून, ते दुरुस्त करण्याची मागणी सदस्यांनी केली.