चंदगड येथे गोवा बनावटीच्या अवैध दारूप्रकरणी एकास अटक
By Admin | Updated: June 22, 2017 17:38 IST2017-06-22T17:38:51+5:302017-06-22T17:38:51+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, ५0 हजारांचा मुद्देमाल जप्त

चंदगड येथे गोवा बनावटीच्या अवैध दारूप्रकरणी एकास अटक
आॅनलाईन लोकमत
गडहिंग्लज , दि. २२ : बिजूर ( ता. चंदगड) येथे गोवा बनावटीचे बेकायदा मद्य बाळगल्याप्रकरणी एकास अटक करून ४८ हजार ६८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरेश आप्पा सलाम (वय ३२, रा. बिजूर, ता. चंदगड) असे संशयिताचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज विभागाने ही कारवाई केली. पथकाला सुरेश हा चंदगड आंबोली मार्गावर बिजूर गावानजीक दुचाकीवर गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह आढळला. त्याच्याकडून ७५0 मिलीच्या १२ आणि १८0 मिलीच्या ७२ बाटल्या गोवा बनावटीचे मद्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
या कारवाईत गडहिंग्लज विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक डी. एस. कोळी, ए. एस. कोळी, ए. जी. पाटील आदींनी भाग घेतला.