गंजीमाळ सशस्त्र धुमाकूळ प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:06+5:302021-01-02T04:22:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गंजीमाळ परिसरात सशस्त्र टोळक्याने दोन घरांसह परिसरातील वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी शुक्रवारी जुना राजवाडा ...

गंजीमाळ सशस्त्र धुमाकूळ प्रकरणी एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गंजीमाळ परिसरात सशस्त्र टोळक्याने दोन घरांसह परिसरातील वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताला अटक केली. त्याला पाच जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. वैभव शहाजी कुरणे (वय २३, रा. वारे वसाहत) असे त्याचे नाव आहे.
गंजीमाळ परिसरात गुरुवारी (दि. ३१) भरदिवसा पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या सशस्त्र हल्ल्यात सहाजण जखमी झाले होते. तलवारी घेऊन दोन घरांतील प्रापंचिक साहित्याची मोडतोड आणि चारचाकी, एक रिक्षा व चार दुचाकींचीही मोडतोड करून नुकसान केले. या युवकांनी मोठ्या प्रमाणात मोडतोड करीत दहशत माजविली होती. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी दिवसभर जोरदार प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये संशयित कुरणे याला ताब्यात घेतले.