शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनीच महागाई विरोधात गडहिंग्लजला महिलांची निदर्शने, रस्त्यावर चूल पेटवून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:20 IST

गडहिंग्लज : या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पायं ! यासह महागाईच्या विरोधात जोरदार  घोषणाबाजी करून येथील महिलांनी ...

गडहिंग्लज : या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पायं ! यासह महागाईच्या विरोधात जोरदार  घोषणाबाजी करून येथील महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. प्रांतकचेरीसमोर रस्त्यावरच चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला समन्वयसमितीतर्फे ही निदर्शने करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून देण्यात आले.निवेदनात, आंतरधर्मीय विवाहावर नजर ठेवू पाहणारा राज्य शासनाचा जी.आर. रद्द करा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मिळणारे ५ किलो धान्य पूर्ववत द्या, शासकीय-निमशासकीय खात्यातील रिक्त जागा त्वरीत भरा, शेतकऱ्यांची कर्जमाफी,  प्रोत्साहन अनुदान त्वरीत द्या, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि वीजेची दरवाढ रद्द करा, शिक्षण, आरोग्य, रोजगार योजनावरील गुंतवणूक वाढवा, महिला विषयक कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, वृद्ध, निराधार, विधवांची पेन्शन वाढवा, दिव्यांग महिलांच्या विकासासाठी आर्थिक निधी द्या, सरकारी जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करा, बेघरांच्या घरांसाठी जागा, घरबांधणीसाठी आर्थिक मदत करा आदी मागण्यांचा समावेश आहे.आंदोलनात, कॉ. उज्वला दळवी, क्रांतीदेवी कुराडे, ऊर्मिला जोशी, छाया वडगावे, ऊर्मिला कदम, सुवर्णलता गोईलकर, सुमन सावंत, सुनिता नाईक, गीता मगदूम, अरूणा रेडेकर, सीमा जाधव, महादेवी मगदूम, कलावती गुरव, राजश्री इंदूलकर, सुला भंडारे, शारदा आजरी, कमल सुतार, शहिदा विजापुरे आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाInflationमहागाईagitationआंदोलन