शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल, नोटीस देवूनही १६ कर्मचारी गैरहजरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:13 IST

आतापर्यंत किती अर्जांची विक्री झाली..

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी पाच उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर ४९१ अर्जांची विक्री झाली. गेल्या तीन दिवसांत १५३५ अशी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. परंतु, आतापर्यंत केवळ आठ उमेदवारांनी त्यांची नामनिर्देशनपत्रे भरली आहेत.प्रभाग क्रमांक २० ई मधून राजू आनंदराव दिंडोर्ले, ११ ड मधून विजय दरवान, ११ अ मधून निलांबरी अशोक साळोखे, १३ अ मधून स्वाती संतोष कदम तर १४ क मधून अमर समर्थ यांनी शुक्रवारी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. दिंडोर्ले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.गेल्या तीन दिवसांत १५३५ नामनिर्देशपत्रांची विक्री झाली असल्याने मोठ्या संख्येने उमेदवार असतील आणि सोमवारी, मंगळवार असे दोन दिवस मोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्रे दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाच आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा मंगळवार (दि.३० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार आहेत.

वाचा : महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान

मतदान यंत्रे ताब्यात घेण्यास सुरुवातमहानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कंट्रोल युनिटसह इलेक्ट्रिक मतदान यंत्रे ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी कागल तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील ४९४ कंट्रोल युनिटसह ११२१ इलेक्ट्रिक मतदान यंत्रे ताब्यात घेतली. कागल तहसीलकडून २७९ कंट्रोल युनिट, १५५ मतदान यंत्रे तर पन्हाळा तहसीलकडून २२७ कंट्रोल युनिट व ६२४ मतदान यंत्रे ताब्यात घेतली जाणार आहेत.

इचलकरंजी भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, उद्या मुंबईत ‘वर्षा’वर बैठक; नेमकं काय घडलं..वाचा

१६ कर्मचारी गैरहजरचनिवडणुकीच्या कामावर राहण्याचे आदेश देऊनही ५० कर्मचारी हजर न होता, दांडी मारली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नोटीस दिल्यानंतर त्यापैकी ३४ कर्मचारी कामावर हजर झाले; परंतु १६ कर्मचारी अद्याप हजर झालेले नाहीत. त्यांचे खुलासे पाहून पुढील कारवाई केली जाणार आहे.

मतदार याद्या प्रसिद्धीस सात दिवसांची मुदतवाढकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी मतदार याद्या प्रसिद्धीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला.याआधीच्या आदेशानुसार आज, शनिवारी सर्व २० प्रभागांच्या मतदार याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करायच्या होत्या. महापालिका प्रशासनाने तशी तयारीही केली होती. मतदार याद्या मिळण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आता आणखी सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Five nominations filed, 16 employees absent despite notice.

Web Summary : Five candidates filed nominations for Kolhapur Municipal Election 2026. 1535 application forms sold, but only eight nominations filed. Voting machines being acquired. Sixteen employees remain absent despite notices issued for election duty.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६