शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीच्या सुटकेसाठी धावली रुग्णवाहिका, प्लास्टिकच्या पिशव्यांनी कोंडलेल्या झाडाने घेतला मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:43 IST

दिनकर चौगले यांची धडपड

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील बाभळीचा झाडाला प्लास्टिकच्या पिशव्यांनी अक्षरक्ष: कोंडले होते. मानवी आयुष्याला बसलेला प्लास्टिकच्या वेढ्याचे हे झाड म्हणजे प्रतिकच ठरावे. परंतु, संवेदनशील निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी ही झाडाची अवस्था पाहिली आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या झाडाचा श्वास मोकळा केला.घडले ते असे : दिनकर चौगुले हे मुंबईहून रेल्वेने गेल्या पंधरवड्यात कोल्हापूरला येत होते. प्रवासादरम्यान माळावर प्लास्टिकने वेढलेले हे बाभळीचे झाड त्यांनी पाहिले. या झाडाचे खोड हिरवे होते तर विस्तार प्लास्टिकच्या विळख्याने वाळत चालला होता. थाेडक्यात त्या झाडाची नाशाकडे वाटचाल सुरू होती. ते पाहून ते मनोमन अस्वस्थ झाले. माणसाच्या तोंडाला महिनाभर प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर कसे होईल, असा विचार त्यांच्या मनांत आला आणि या झाडाला मोकळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.कोल्हापुरातील गंगावेश येथील नाना प्रेमी विचारमंचचे अमर जाधव यांना ही बाब त्यांनी सांगितली. या सर्वांनी निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने रुग्णवाहिकेतून रुग्णाला वाचवण्यासाठी नेले जाते. तसे हे सर्वजण रुग्णवाहिकेतून हातकणंगले येथे गेले. काटेरी बाभळीच्या झाडावरील तीन पोती प्लास्टिक कचरा अतिशय परिश्रमपूर्वक काढण्यात आला आणि हे झाड मोकळे केले. प्रा. अनिल पुणवतकर, जितेंद्र चव्हाण, आदित्य देवकुळे यांचेही त्यांना याकामी सहकार्य मिळाले.

प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणावर तर गंभीर परिणाम होत आहे. शिवाय मानवाला सुध्दा त्याचे परिणाम भोगावे लागणार आहे. प्लास्टिकच्या विळख्यात सापडलेल्या बाभळीच्या झाडाचा श्वास गुदमरल्यामुळे ते वाळत चालले होते. मानवाला हा इशारा असून यातून बोध घेण्याची गरज आहे. - दिनकर चौगुले निसर्गमित्र पोर्ले तर्फ ठाणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण