दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशींचा 'रोड शो', आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून पळवली म्हैस -video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 01:59 PM2022-10-26T13:59:34+5:302022-10-26T14:23:47+5:30

शोमध्ये एका म्हशीच्या पाठीवर तिच्या मालकाने नक्षीदार रचना केली होती. म्हशीच्या पाठीवरील केस कापताना त्यावर नक्षी काम केल्याने ही म्हैस आकर्षक दिसत होती. तसेच ह्या म्हशीला पाहणाऱ्यांची वाहवा ही मिळत होती.

On the occasion of Diwali Padwa buffalo road show in Kolhapur, MLA Rituraj Patil drove buffalo in a car | दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशींचा 'रोड शो', आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून पळवली म्हैस -video

दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशींचा 'रोड शो', आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून पळवली म्हैस -video

googlenewsNext

दुर्वा दळवी

कोल्हापूर : दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बाबड्यात म्हशींच्या रोड शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडल्या. सजल्या धजलेल्या म्हैशी आणि रोड शो पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून म्हैस पळवली.

कोल्हापूरच्या कसबा बावडा, सागरमाळ, पंचगंगा घाट, पाचगाव या ठिकाणी पाडव्यानिमित आकर्षक अशा सजून धजून म्हैशी आणल्या जातात. तिथे त्यांचा दिमाखदार रोड शो दरवर्षी दिवाळी पाडव्याला केला जातो. म्हैस मालक या दिवशी आपल्या म्हशींना न्हाऊ माखु घालून त्यांची शिंगे रंगवतात, गुलाल लावतात, विविध रंगांची नक्षी म्हशीवर काढून, पायांत घुंगरू बांधून रोड शोसाठी आणतात. हलगीच्या ठेक्यावर इथे या रोड शोचा रंगतदार कार्यक्रम होतो. म्हैस मालक दुचाकीवर बसून आपल्या म्हशींचा रोड शो करतात म्हणजेच त्यांना लाल रंगाचे, काळ्या रंगाचे कापड दाखवून आपल्या गाडीच्या मागवून पळवतात असा हा रोड शो सादर होतो.

कसबा बावडा परिसरात आजही ही परंपरा जपली जाते. साधारणपणे तीन ते चार लाख किंमत असलेल्या ह्या सगळ्या म्हशी असतात. हा रोड शो पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात हा रोड शो पार पडला.

नक्षीदार पाठीची म्हैशीने मिळवली वाहवा

कसबा बावड्यातील रोड शोमध्ये एका म्हशीच्या पाठीवर तिच्या मालकाने नक्षीदार रचना केली होती. म्हशीच्या पाठीवरील केस कापताना त्यावर नक्षी काम केल्याने ही म्हैस आकर्षक दिसत होती. तसेच ह्या म्हशीला पाहणाऱ्यांची वाहवा ही मिळत होती.

आमदार ऋतुराज पाटील यांनी गाडीवर बसून म्हैस पळवली

या रोड शोमध्ये मुख्यत: म्हैस मालक आपल्या म्हैशींना दुचाकीवर बसून सायलेंसरच्या आवाज काढत, लाल कापड फाकवून त्यांना आकर्षित करत पळवतात. कसबा बावड्यातील या रोड शोला आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनतर त्यांनी ही दुचाकीवर बसून या रोड शोचा आनंद लुटला.


Web Title: On the occasion of Diwali Padwa buffalo road show in Kolhapur, MLA Rituraj Patil drove buffalo in a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.