शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2023: चौथ्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा, नवदुर्गांपैकी चौथे रूप 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 18, 2023 16:36 IST

अंबाबाई उद्या देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा बांधण्यात आली. कुष्मांडा हे नवदुर्गांपैकी चौथे रूप आहे. आपल्या ईश्वरी हास्यातून या देवीने ब्रह्मांडाची रचना केली. सूर्यलोकांत तिचा निवास असून, ती तेज आणि चैतन्याने परिपूर्ण आहे. उद्या गुरुवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणार आहे.श्री कुष्मांडा देवी ही अष्टभूजादेवी असून, तिच्या हातात कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृतकलश, चक्र, गदा आहे. आतल्या हातात सर्व सिद्धी व धनसंपत्ती देणारी माळ आहे. तिचे वाहन सिंह आहे. तिच्या शरीराचे तेज आणि कांती सूर्यासारखी तेजस्वी, देदीप्यमान आहे. या तेज व प्रकाशामुळे दाहीदिशा प्रकाशमान होतात. संस्कृतमध्ये कोहळ्याला कुष्मांड म्हणतात. देवीच्या होमहवनात कोहळ्याचे समर्पण केले जाते. नवरात्रोत्सवात चतुर्थीला कुष्मांडा देवीची उपासना केली जाते.ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.

अंबाबाई देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाणारनवरात्रोत्सव गुरुवारी ललिता पंचमी असून, यादिवशी अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीचा रुसवा काढण्यासाठी लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईची उत्सवमूर्ती सकाळी १० वाजता तोफेच्या सलामीने येथे छत्रपतींच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन केले जाते. तिच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा भेदण्याचा विधी होतो. त्यानंतर अंबाबाईची पालखी परतीच्या मार्गाला लागते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर