शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri २०२५: आठव्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:50 IST

आई अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने मानाचे महावस्त्र म्हणजेच साडी अर्पण करण्यात आली

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आठव्या माळेला सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची श्री महाकाली देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. दरम्यान, सोमवारी दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती पीठ म्हणून आई अंबाबाईला तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने मानाचे महावस्त्र म्हणजेच साडी अर्पण करण्यात आली.दुपारी बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची महाकाली रूपात पूजा बांधण्यात आली. हिचे मुख भीतिदायक असून, मुक्तकेशी, मुंडमाला धारण केलेली, चारहात असलेली डाव्या खालील हातात नुकतेच कापलेले नरमुंड व वरील हातात खड्ग उजव्या वरील हातात अभयदायी आशीर्वाद व खालील हात अभयमुद्रादर्शक आहे. सृष्टीचा लय करणे हे हिचे कार्य असून, सृष्टीच्या आरंभी हीच सर्वत्र व्याप्त होती. ब्रह्मदेवांनी मधु-कैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करणेसाठी, योगनिद्रा महाकालीचीच प्रार्थना केली. तेव्हा विष्णूंच्या चेहरा, बाहू व हृदयातून हिचे तेज व स्वरूप प्रगटले. हीच महाकाली होय. अश्विन शुद्ध अष्टमीस हिची उत्पती मानली जाते. ही पहिली महाविद्या असून, हिचा महाकाल भैरव आहे, आश्विन कृष्ण अष्टमीला हिची उत्पती झाली. ही कालीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिच्या उपासनेने बाधा निवारण, सुख सौभाग्य व ब्रह्मज्ञान प्राप्ती, पराक्रमप्राप्ती सर्वत्र विजयप्राप्ती, सकल वैभवप्राप्ती होते. दक्षिणकाली, स्मशानकाली, संततिप्रदाकाली, स्पर्शमणिकाली, चिंतामणिकाली, भद्रकाली, कामकलाकाली, हंसकाली हे हिचे प्रकार व उपसनाभेद आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ambabai Navratri: Mahakali form worshipped on the eighth day.

Web Summary : During Navratri, Kolhapur's Ambabai was worshipped as Mahakali. The deity was adorned with a fearsome appearance, symbolizing the power to destroy and recreate, bestowing blessings and victory.