शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Kolhapur News: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मानाची सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:43 IST

श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत महापूजा 

दत्तात्रय धडेलजोतिबा : जोतिबा डोंगरावर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निगवेतील हिम्मतबहाद्दरांची मानाची सासनकाठी जोतिबा डोंगर दाखल झाली. जोतिबाची सरदारी पगडी महापुजा बांधून नवीन वर्षाचे पंचाग वाचन करण्यात आले.          

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच जोतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या. श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत महापूजा दरम्यान, मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली. मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचविली. सासनकाठीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, लोकनियुक्त सरपंच राधा बुणे, केदारलिंग देवस्थान समितीचे अधीक्षक दिपक म्हेत्तर, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते. गुलाल-खोबऱ्याची उधळण मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या. त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली. दुपारी १२ वाजता तोफेच्या सलामीने श्री चे मुख्य पुजारी यांचे हस्ते नवीन वर्षाचे पंचागाचे पुजन करण्यात आले. ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी नवीन पंचांगाचे वाचन केले. गुळलिंब वाटप करण्यात आला.चैत्र यात्रेचे नियोजनदरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या. निनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (सांगली), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी, दरवेश पाडळी, सांगली, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात जोतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे, याचे नियोजन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा