शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या उद्यापासून होणाऱ्या सर्व परीक्षा लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:22 IST

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा उद्या, शनिवारपासून प्रारंभ होणार होता. मात्र, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आग्रही आहेत. त्यांनी या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन केले. त्यावर विद्यापीठाने सर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला. गेल्या आठवड्यापासून त्यांनी लढ्याची तीव्रता वाढविली. त्यावर विद्यापीठाने गुरूवारी सायंकाळी अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू, तर उर्वरीत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन वर्णनात्मक घेण्याचा निर्णय जाहीर केला.मात्र, विद्यार्थी संघटना सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू स्वरूपात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्या. सर्व विद्यार्थी संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांची मागणी सोमवारी विद्या परिषद या अधिकारमंडळासमोर विद्यापीठ प्रशासनाकडून ठेवण्यात येणार आहे. त्यातील निर्णयानंतर परीक्षेचे स्वरूप आणि सुधारित वेळापत्रक जाहीर होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थी