आॅलिम्पिकवीर आज कोल्हापुरात

By Admin | Updated: November 17, 2014 00:36 IST2014-11-17T00:36:17+5:302014-11-17T00:36:25+5:30

‘आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टत’र्फे (ओजीक्यू) उद्या, सोमवारी आॅलिम्पिक विजेत्या खेळाडूंसह

Olympics Today in Kolhapur | आॅलिम्पिकवीर आज कोल्हापुरात

आॅलिम्पिकवीर आज कोल्हापुरात

कोल्हापूर : आॅलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ‘आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टत’र्फे (ओजीक्यू) उद्या, सोमवारी आॅलिम्पिक विजेत्या खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कोल्हापूरकरांच्या भेटीला येणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता धैर्यप्रसाद मंगल कार्यालयातील कार्यक्रमात ते संवाद साधणार आहेत. यात गगन नारंग, योगेश्वर दत्त, राही सरनोबत, देवेंद्रो सिंग, आदी खेळाडू सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून, यामध्ये खेळाडू, त्यांचे शालेय जीवन, क्रीडाक्षेत्रातील प्रवेश, अडचणींशी करावा लागलेला सामना, समाजातून झालेली मदत यातून आपली यशोगाथा उलगडणार आहेत. कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय बिलिअर्डस्पटू गीत सेठी, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन रासक्वीन्हा उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Olympics Today in Kolhapur