शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

सर्वात जुनी झाडे, हेच आपले सेलिब्रेटी : सयाजी शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 15:26 IST

झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, असे मत अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वात जुनी झाडे, हेच आपले सेलिब्रेटी : सयाजी शिंदेकोल्हापूरात ग्रेटा थनबर्गच्या मराठी व्हिडीओचे लोकार्पण

कोल्हापूर : झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, असे मत अभिनेते आणि सह्याद्री वनराई वृक्षचळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले.'जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरातील फ्रायडेज फॉर फ्युचर या संस्थेमार्फत आप्पाज कॉम्प्लेक्स येथील कार्यक्रमात ग्रेटा थनबर्ग हिच्या गाजलेल्या भाषणांचा मराठीतील पहिल्या व्हिडीओचा लोकार्पण सोहळा सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, फ्रायडेज फॉर फ्युचरचे नितीन डोईफोडे उपस्थित होते. यावेळी 'ग्रेटाची गोष्ट' या मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकाचेही सयाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.सामाजिक अंतर ठेवून मास्क, सॅनिटायझरसह शासकीय नियम पाळत अवघ्या १५ पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, पर्यावरणाविषयी ग्रेटासारख्या लहान मुलांनी मोठ्यांना वास्तवाची जाणीव करून द्यायची वेळ आपण आणली आहे, हे दु:खदायक आहे. स्वीडनमधल्या मुलांनी हे करुन दाखविले. खरंतर आपल्या देशात अनेकांनी उदाहरण देउन निसर्ग वाचविण्यासाठी आंदोलने केली आहेत, त्यामुळे प्रत्येकाने स्वत:पासून बदलास सुरुवात करावी, असे सयाजी यांनी आवाहन केले.

आईनंतर वृक्ष आपल्याला आॅक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना आॅक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी, असे मत सयाजी यांनी मांडले.नितीन डोईफोडे यांनी फ्रायडेज फॉर फ्युचर-महाराष्ट्रतर्फे प्रास्ताविक केले. ग्रेटा थनबर्ग, तिचे दोनशे देशांत चालू असलेले आंदोलन याबद्दल माहिती दिली. सुहास वायंगणकर यांनी वैश्विक विचार, स्थानिक आचार व वैयक्तिक कृती करतानाच आपल्या हातून कळत नकळत होत असलेले प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे अशा शब्दात पर्यावरणाचे महत्व सांगितले.

जंगले, त्यांना जोडणारे कॉरिडॉर हे सांभाळले तरच वाघांचे व पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे असे ते म्हणाले. सयाजी शिंदे यांचे चिरंजीव सिध्दार्थ ह्या दहावीतील विद्यार्थ्यांने पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. योगेश माळी यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरsayaji shindeसयाजी शिंदे