वृध्देचे ‘धूम’ स्टाईलने दागिने चोरणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST2021-08-24T04:29:57+5:302021-08-24T04:29:57+5:30

कोल्हापूर : कदमवाडी रोडवर कारंडे मळा येथे मॉर्निंग वॉकला चाललेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याची चेन ‘धूम’ स्टाईलने चोरणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मुसक्या ...

Old man's 'Dhoom' style jewelery thief arrested | वृध्देचे ‘धूम’ स्टाईलने दागिने चोरणाऱ्यास अटक

वृध्देचे ‘धूम’ स्टाईलने दागिने चोरणाऱ्यास अटक

कोल्हापूर : कदमवाडी रोडवर कारंडे मळा येथे मॉर्निंग वॉकला चाललेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याची चेन ‘धूम’ स्टाईलने चोरणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आवळल्या. सागर विश्वास अस्वले (वय ३७, रा. चौगुले गल्ली, निगवे दुमाला, ता. करवीर) असे अटक केलेल्या या ‘चेनस्नॅचर’चे नाव आहे. त्याने चोरलेली सुमारे १७ ग्रॅम सोन्याची चेन व वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निर्मला श्रीचंद छाबडा (६२, रा. मेरी गोल्ड अपार्टमेंट, कारंडे मळा, कोल्हापूर) या नेहमीप्रमाणे बुधवारी (दि. १८ ऑगस्ट) मॉर्निंग वॉकसाठी जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून वेगाने येऊन त्यांच्या मानेवर जोराचा फटका मारला व त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली होती. त्याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. छाबडा यांनी चोरट्याच्या केलेल्या वर्णनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पो. नि. शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पो. नि. सत्यराज घुले यांच्या पथकाने तपास केला. यावेळी पथकाने परिसरातील सीस टीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेतला.

मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे संशयित आरोपी सागर अस्वले हा शिवाजी विद्यापीठ ते मोरेवाडी रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्याद्वारे पोलिसांनी पेट्रोलिंग करताना संशयित अस्वले याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने चेनस्नॅचिंग’ची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या ताब्यातून १७ ग्रॅमची चोरलेली सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोटो नं. २३०८२०२१-कोल-चेनस्नॅचर

ओळ :

कदमवाडी रोडवरील कारंडे मळा येथे पाच दिवसांपूर्वी वृध्देच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणाऱ्या सागर अस्वले या दुचाकीस्वार चोरट्यास सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांनी अटक केली.

230821\23kol_14_23082021_5.jpg

ओळ : कदमवाडी रोडवरील कारंडे मळा येथे पाच दिवसापूर्वी वृध्देच्या गळ्यातील दागिणे हिसकावून नेणार्या सागर अस्वले या दुचाकीस्वार चोरट्यास सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांच्या पोलिसांनी अटक केली.

Web Title: Old man's 'Dhoom' style jewelery thief arrested