देवकांडगाव येथील वृद्धाचा झाडावरुन पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:18 IST2021-05-03T04:18:20+5:302021-05-03T04:18:20+5:30
अधिक माहिती अशी, माडभगत हे रोज सकाळी ७ वाजता बाऊ नावाच्या शेतात काजू काढण्यासाठी जात होते व येताना जळणासाठी ...

देवकांडगाव येथील वृद्धाचा झाडावरुन पडून मृत्यू
अधिक माहिती अशी, माडभगत हे रोज सकाळी ७ वाजता बाऊ नावाच्या शेतात काजू काढण्यासाठी जात होते व येताना जळणासाठी लाकडे जमा करून घेऊन घरी येत होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने वृद्धावस्थेतही ते काजू बिया आणण्यासाठी व त्यातच जळाऊ लाकडे जमा करण्यासाठी रोज जात होते.
नेहमीप्रमाणे शनिवार (१) सकाळी ७ वाजता शेताकडे गेले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास काजू बिया जमा करून झाल्यानंतर लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढले. यावेळी फांदी तोडत असताना फांदीवरून पाय घसरल्याने ते झाडावरून खाली पडले. मानेवरतीच पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, यावेळी उसाला पाणी पाजून घरी येत असलेल्या संभाजी मडव यांच्या निदर्शनास ही आल्यानंतर त्यांनी तत्काळ नातेवाइकांना ही घटना सांगितली. या घटनेची नोंद पोलिसात झालेली नाही. त्यांच्या पश्यात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
* घरी गॅस नसल्याने दुर्दैवी मृत्यू
शासनाने उज्ज्वला गॅस व डोंगरी भागात वनविभागातून गॅस योजना सुरू केली आहे. परंतु, या गरीब कुटुंबापर्यंत अद्यापही योजना पोहचलेली नाही. घरी गॅस नसल्याने रामू माडभगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
------------------------
* रामू माडभगत : ०२०५२०२१-गड-०१