वृद्ध दाम्पत्याला गंडा घालणारा इचलकरंजीतील भामटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:51+5:302021-01-03T04:26:51+5:30
कोल्हापूर : शासकीय योजनेतून लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याचे सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन ...

वृद्ध दाम्पत्याला गंडा घालणारा इचलकरंजीतील भामटा गजाआड
कोल्हापूर : शासकीय योजनेतून लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील वृद्ध दाम्पत्याचे सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या भामट्याने भामट्याला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. अनिल गुंडा केंगार (वय ६२, रा. इचलकरंजी) असे त्या भामट्याचे नाव आहे. गोदाबाई कांबळे व त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे (वय ७०, रा. शिपूर ता. चिक्कोडी, कर्नाटक) या दाम्पत्याची सोमवारी (दि. २८) फसवणूक केली होती.
गोदाबाई आणि त्यांचे पती अण्णाप्पा कांबळे हे वृद्ध दाम्पत्य निपाणी येथे उपचारासाठी गेले होते. निपाणी बसस्थानकावर त्यांना गाठून एका भामट्याने शासकीय योजनेतून लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखविले. तो त्यांना कोल्हापुरात घेऊन आला. त्या दोघांना रुईकर कॉलनीत थांबवून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा केला होता. त्या प्रकरणी गोदाबाई कांबळे यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाने अनिल गुंडा केंगार या भामट्याचा माग काढून शनिवारी त्याला अटक केली.