महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:24 IST2019-05-21T16:23:10+5:302019-05-21T16:24:31+5:30

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

Officers, employees took the terrorism, anti-violence pledge in municipal corporation | महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल शिंदे चौकात मंगळवारी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद, हिंसाचारविरोधी प्रतिज्ञामहापौर सरीता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित

कोल्हापूर : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमीत्त मंगळवारी महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी ‘आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्य धोक्यात आणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी महापौर सरीता मोरे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, एलबीटी आॅफिसर सुनिल बिद्रे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, स्टेशन आॅफिसर तानाजी कवाळे, आस्थापना अधिक्षक सागर कांबळे, विजय वणकुद्रे, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Web Title: Officers, employees took the terrorism, anti-violence pledge in municipal corporation