‘लोकमत’मुळे कुलर बसविण्याचे काम झाले सुरु आरोग्य उपसंचालक कार्यालय : झाडाखाली पडून होती यंत्रसामुग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:56+5:302021-06-01T04:17:56+5:30

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या येथील औषध भांडारात औषध ठेवण्यासाठी शासनाकडून आलेला तीन कोटी रुपयांचा वाॅक इन ...

Office of the Deputy Director of Health started installing coolers due to 'Lokmat': Machinery was lying under a tree | ‘लोकमत’मुळे कुलर बसविण्याचे काम झाले सुरु आरोग्य उपसंचालक कार्यालय : झाडाखाली पडून होती यंत्रसामुग्री

‘लोकमत’मुळे कुलर बसविण्याचे काम झाले सुरु आरोग्य उपसंचालक कार्यालय : झाडाखाली पडून होती यंत्रसामुग्री

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या येथील औषध भांडारात औषध ठेवण्यासाठी शासनाकडून आलेला तीन कोटी रुपयांचा वाॅक इन कुलर जोडण्याचे काम स्थानिक कंपनीकडून सोमवारपासून सुरु झाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यास प्राधान्य देत येत असून, आरोग्य उपसंचालक कार्यालयाला आलेले उपकरण तब्बल दोन महिने लाॅकडाऊनमुळे हैदराबादहून येणारे कारागीर येत नसल्याचे कारण सांगून जोडून घेतले नव्हते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उपसंचालक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाशी तातडीने पत्रव्यवहार करुन वाॅक इन कुलर जोडण्याबाबत हालचाली केल्या व कोल्हापूरमधील अभिजीत रेफ्रिजरेशन या स्थानिक कंपनीला कुलर जोडण्याचे काम दिले. या कंपनीने हे काम सोमवारी दुपारपासुन सुरू केले आहे. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

--------------

फोटो ३१०५२०२१-कोल-बंद कुलर सुरु

‘तीन कोटींचा कुलर वापराविना पडून’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून सोमवारपासून हा कुलर जोडण्याचे काम स्थानिक कंपनीच्या मदतीने सुरु झाले. (छाया - दीपक जाधव)

-----------

Web Title: Office of the Deputy Director of Health started installing coolers due to 'Lokmat': Machinery was lying under a tree