शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: आक्षेपार्ह स्टेटस; वडगाव, मिणचे, सावर्डे येथे तणाव, दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:26 IST

गोडाऊन, ट्रक पेटवला

पेठवडगाव : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवून समाजाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून शुक्रवारी सावर्डे, मिणचे, वडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात देशद्रोही कलमे लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. यासाठी सावर्डे ते वडगाव पोलिस ठाणे अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. यामुळे वडगाव, मिणचे, सावर्डेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सावर्डे (ता. हातकणंगले) येथील महंमद युनूस मोमीन या तरुणाने औरंगाबाद नामांतर व औरंगजेबच्या समर्थनाचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता. यावरून सावर्डे परिसरातील संतप्त तरुणांनी गुरुवारी तरुणाच्या घराकडे धाव घेत तरुणाच्या वडिलास मारहाण केली. तसेच पोस्ट करणाऱ्या तरुणाविषयी विचारणा केली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्या घराच्या काचा व गाडी काही तरुणांनी फोडली. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पालिका चौकात निषेध सभा घेतली.सावर्डेतील घटना ताजी असताना मिणचे (ता. हातकणंगले) येथील फैयाज सौदागर नावाच्या मुलाने तसाच स्टेटस ठेवला. यामुळे शुक्रवारी वातावरण पुन्हा तंग झाले. हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मिणचे गावात दुचाकी रॅली काढली. ही रॅली सावर्डे भागात जाऊन वडगाव पोलिस ठाण्याच्या समोर आली. यावेळी पोलिस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या मांडला. दोन्ही तरुणांवर देशद्रोहाची कारवाई केल्याशिवाय उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव कारवाईच्या मागणीवर ठाम राहिला. काही युवकांनी वडगाव शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त केला. ॲड. दीपक पाटील यांनी मध्यस्थी करून जमावास शांत केले. यावेळी प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. सावर्डे, मिणचे गावातील दुकाने बंद होती. याशिवाय पेठवडगाव शहरातील काही ठिकाणी दुकाने बंद झाली होती. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्यासह, दंगल नियंत्रक पथक तैनात केले होते.

गोडाऊन, ट्रक पेटवलासावर्डे येथील सद्दाम मोमीन यांचे मिणचे रोडवर साखर पोत्यांचे गोडावून आहे. या गोडावूनला अज्ञातांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लावली. या आगीत गोडावूनमधील सुमारे आठ लाख किमतीची साखरेची रिकामी पोती, बारदाने जळून खाक झाले. तसेच आयशर टेम्पो व त्यातील रिकामी पोती जाळली. ही आग वडगाव पालिका, कोल्हापूर महानगरपालिका, नरंदे साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. यामध्ये दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उशिरापर्यंत वडगाव पोलिसात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस