शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'द केरळ स्टोरी' सिनेमावरुन आक्षेपार्ह पोस्ट, कोल्हापुरातील आजऱ्यात तणाव, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:05 IST

शांतता कमिटीच्या बैठकीनंतर पुकारलेला बंद मागे

सदाशिव मोरेआजरा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो व मजकूर टाकल्यामुळे आजऱ्यात काल, बुधवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास जातीय तणाव निर्माण झाला होता. याच्या निषेधार्थ आज आजरा बंद पुकारण्यात आला होता. याप्रकरणी रात्रीच आजरा पोलिसांनी अथर्व रोडे या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, आज, सकाळी तहसिल कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पुकारलेला आजरा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.बारावीचे शिक्षण घेणाऱ्या अथर्व रोडे या तरुणाने 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर फोटो मजकूर टाकला. त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये तेढ निर्माण झाला. याच्या निषेधार्थ रात्री आजऱ्यात तणावपूर्ण शांतता होती. रात्री पोलीस स्टेशन समोर हुल्लडबाजी करीत काही तरुणांनी अथर्व रोडे या तरुणाला तातडीने अटक करा अशी मागणी केली तर आज आजरा बंदचा निर्णय जाहीर केला.दरम्यान, आज सकाळी आजरा तहसिल कार्यालयात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी अक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या अथर्व रोडे या तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे बंद शांततेत पार पडावा असे आवाहन केले. तर यापुढे असे निंदनीय प्रकार घडू नयेत यासाठी सर्व धर्मीयांनी प्रयत्न करावेत असे आवाहन तहसिलदार समीर माने यांनी केले.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाचा वापर कटाक्षाने करावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी केले. यावेळी दिवाकर नलवडे, मंजूर मुजावर, अबुसईद माणगावकर, आनंदा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले व आजरा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.बैठकीला  नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, मुख्याधिकारी सुरेश सुर्वे, प्रशासन अधिकारी राकेश चौगुले, यासह शांतता कमिटी, सर्वपक्षीय, सर्वधर्मीय सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी