शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्टमुळे तुरंबेत तणाव, एकास अटक; गावात मोठा पोलिस बंदोबस्त, कोल्हापुरात वाढले प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 13:50 IST

संबंधित तरुणाच्या ग़ैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवला

तुरंबे : प्रसारमाध्यमाच्या गैरवापरामुळे तरुणपिढी धोक्यात आल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी अशीच घटना राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे घडली. येथील एका तरुणाने दोघात झालेल्या संभाषणात महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग केल्याची माहिती उघडकीस आली. याबद्दल सिद्दीक इम्रान बागवान रा. तुरंबे (ता.राधानगरी) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सकाळी कोल्हापुरात अटक केली. त्याच्यावर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.दोन तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन जातीमध्ये तेढ निर्माण झाल्याने तुरंबे (ता. राधानगरी) येथे ऐन यात्रेच्या दिवशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ, पैपाहुणे भयभीत झाले. सर्व गावात जमलेल्या तरुणांच्या जमावाने घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. दुपारी थोर महापुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त असलेला व्हायरल मेसेज गावातील तरुणाच्या व्हाॅट्सअॅपवर आल्याने हळूहळू ही बातमी गावभर पसरली. तरुण एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देत तरुणांनी गावातील गल्लीगल्लीतून मोर्चा काढला. प्रार्थनास्थळावरील स्पीकर उतरवला. तेथून गावच्या मुख्य छत्रपती शिवाजी चौकात गेल्यावर घोषणाबाजी केली. त्यानंतर राधानगरी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी संबंधित तरुणावर गुन्हा नोंद झाला असून शांततेचे आवाहन करत गावची यात्रा सुरळीत पार पाडा अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर जमाव पांगवला. घटनेमुळे गावातील चौकाचौकांत पोलिस छावणीचे रूप आले.

मुस्लिम समाजातर्फे घटनेचा निषेधतुरंबे येथे हिंदू-मुस्लिम समाजात सलोखा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर करून दोन समाजात द्वेष निर्माण केल्याबद्दलच्या घटनेमुळे संबंधित तरुणाच्या ग़ैरकृत्याबद्दल येथील मुस्लिम समाजाने निषेध नोंदवला. यावेळी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

अल्पवयीन तरुणास अटक करण्यात आली आहे. तुरंबे सलोखा राखणारे गाव आहे. गावात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. वाद होणारे स्टेटस, बॅनर कोणी लावू नये. गावात पूर्ववत शांतता निर्माण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - मंगेश चव्हाण, उपअधीक्षक कोल्हापूर शहर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी