निष्काळजीपणे मोटार चालविल्याबद्दल चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:24+5:302021-02-23T04:36:24+5:30

कोल्हापूर : रंकाळा तलावासमोर शिवाजी मराठा हायस्कूलजवळ भरधाव वेगाने मोटार चालवून अनेक वाहनांना व नागरिकांना धडक देऊन जखमी केल्याची ...

Offense against the driver for reckless driving | निष्काळजीपणे मोटार चालविल्याबद्दल चालकावर गुन्हा

निष्काळजीपणे मोटार चालविल्याबद्दल चालकावर गुन्हा

कोल्हापूर : रंकाळा तलावासमोर शिवाजी मराठा हायस्कूलजवळ भरधाव वेगाने मोटार चालवून अनेक वाहनांना व नागरिकांना धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रविवारी मोटारचालक नागेश विलासराव चौगले (वय ३४, रा. शिवाजी पेठ) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मोटार जप्त केली.

शनिवारी रात्री रंकाळा तलाव संध्यामठ रोडवर टॉवरच्या दिशेने भरधाव वेेगाने धावणाऱ्या मोटारीने परिसरातील सहा ते सात वाहनांना धडक दिली. त्या वाहनांचे नुकसान झाले. त्याशिवाय काही नाष्टा सेंटरच्या हातगाड्यांनाही धडक दिली. या धडकेत नासीर अस्लम मुल्ला (३६, रा. प्रथमेशनगर, कळंबा) व मुसा नजीर ढालाईत (रा. राजेंद्रनगर) हे जखमी झाले. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी मोटारीवर हल्ला करून नुकसान केले.

निष्काळजीपणे वाहन चालवून नुकसान केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी मोटारचालक नागेश विलासराव चौगले (३४, रा. शिवाजी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Offense against the driver for reckless driving