शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकीनिमित्त उसळला भाविकांचा सागर

By admin | Updated: December 9, 2014 23:21 IST

अंगारकीनिमित्त उसळला भाविकांचा सागर

गणपतीपुळे : श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आज (मंगळवार) अंगारकीनिमित्त घाटमाथ्यावरील हजारो भाविकांनी स्वयंभू श्रींच्या दर्शनाला गर्दी केली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड, मिरज या ठिकाणच्या भाविकांबरोबरच मुंबई, पुणे येथील हजारो भाविकांचा जनसागर येथ उसळला होता.अंगारकीनिमित्त संस्थानतर्फे स्वयंभू गणेश मंदिर पहाटे ४ वाजता खुले करण्यात आले. पुजा, मंत्रपुष्प, आरती झाल्यानंतरमंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. यावेळी दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. रांगेमध्ये असलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेऊन मालगुंड येथील वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समितीचे सुरक्षारक्षक, रत्नागिरीतल्या अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवक ठिकठिकाणी गस्त घालत होते. समुद्र किनाऱ्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसर व गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्र या दोन्ही ठिकाणांहून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ध्वनीक्षेपकावरुन विशेष सूचना देण्यात येत होत्या.अंगारकी चतुर्थीनिमित्ताने सायंकाळी ४ वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक हजारोंच्या गर्दीत व मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत काढण्यात आली. अंगारकीमुळे वाहनांच्या पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आली होती. (वार्ताहर)अंगारकीनिमित्त विविध गणेश मंडळांकडून भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाप्रसादाबरोबरच खिचडी प्रसादही उपलब्ध करुन देण्यात आला.यावेळी समुद्र स्नानासाठी पर्यटक गर्दी करतात. येणाऱ्या भाविकांचा लोंढा समुद्र चौपाटीकडे वळताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संस्थानतर्फे उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. त्यामुळे समुद्र चौपाटीवर जाण्या-येण्यासाठी दोन स्वतंत्र उड्डाणपूल तयार करण्यात आल्याने ते आकर्षण ठरले.