जयसिंगपुरात शासकीय कामात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:33+5:302021-03-24T04:22:33+5:30
जयसिंगपूर : अतिक्रमण काढण्यास विरोध करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाचजणांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. इब्राहिम बाबासाहेब ...

जयसिंगपुरात शासकीय कामात अडथळा
जयसिंगपूर : अतिक्रमण काढण्यास विरोध करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाचजणांविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. इब्राहिम बाबासाहेब कासेगावकर, शबाना सरवर खान (दोघे रा. दत्त कॉलनी जयसिंगपूर), नासिरा जमीर खान (रा. शास्त्री चौक, मिरज), साईनाथ वनभिसे (रा. चिपरी, ता. शिरोळ) व जुलेखा फिरोज मुलाणी (रा. जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोदी हॉस्पिटलसमोरील उज्वल झोपडपट्टीतील नगरपालिकेच्या शासकीय जागेत घडली. याबाबतची तक्रार अभियंता रामचंद्र एकनाथ कुंभार (रा. आगर भाग, जयसिंगपूर) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी नगरपालिका हद्दीतील शासकीय जागेतील अतिक्रमण काढणेची कायदेशीर कारवाई सुरू होती. यावेळी संशयित अतिक्रमणधारक इब्राहिम कासेगावकर, शबाना खान, नासिरा खान, साईनाथ वनभिसे व जुलेखा मुलाणी यांनी तक्रारदार कुंभार यांच्यासह पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी धमकी देऊन अतिक्रमण काढण्यास विरोध केला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.