शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

‘थेटपाईपलाईन’च्या मार्गात अडथळेच-: बिल थकविल्याने ठेकेदाराची पाठ; वाढीव मुदत संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:42 AM

कोल्हापूरकरांच्या ३० वर्षांच्या आंदोलनानंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला. सव्वा दोन वर्षांत पूर्ण होणारे काम पाच वर्ष होत आले तरी रखडलेलेच आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे

ठळक मुद्दे धरण भरल्याने जॅकवेलचे काम थांबले

विनोद सावंत ।कोल्हापूर : काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेतील कामात अनेक अडथळ्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. बिल थकल्यामुळे ठेकेदाराने कामाकडे पाठ फिरविली आहे. पावसामुळे धरणक्षेत्रातील जॅकवेल पाण्यात बुडाली आहे. तर पाईपलाईन टाकण्यास अद्यापही काही गावांमध्ये विरोध कायम आहे. अशा प्रतिकूल परिस्थतीत थेट पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूरकरांच्या ३० वर्षांच्या आंदोलनानंतर काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला. आमदार सतेज पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. काँगे्रस-राष्ट्रवादीची केंद्रात सत्ता असताना कामाला मुहूर्त मिळाला. सव्वा दोन वर्षांत पूर्ण होणारे काम पाच वर्ष होत आले तरी रखडलेलेच आहे. ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या ठेकेदाराला दिवसा ५0 हजार रुपयांप्रमाणे दंड सुरू आहे. दुसऱ्यांंदा वाढीव दिलेली मुदत पुढील महिन्यात संपत आहे; परंतु अद्यापही काम अपूर्णच आहे.विधानसभेत थेटपाईपलाईनचा मुद्दा गाजलानुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत थेटपाईपलाईनचा मुद्दा चांगलाच गाजला. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी काम रखडल्यावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. आमच्या नातवाला तरी थेटपाईपलाईनचे पाणी मिळेल काय, असा टोलाही त्यांनी लगावला. यावर आमदार पाटील यांनी सहा महिन्यांत काम पूर्ण होईल आणि नातवाला नव्हे तर तुम्हालाच पाणी पाजू, असा पलटवार केला. यामुळे थेटपाईपलाईन पुन्हा चर्चेत आली.बिल थकल्यामुळे नव्हे, तर दिवाळी सुट्टी आणि पावसामुळे काम थांबले आहे. ठेकेदाराने जीएसटी, तसेच खंड ३८ नुसार भविष्यात होणाºया कामांसाठी २८ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. निविदेतील तरतुदीनुसार ठेकेदाराला चार दिवसांमध्ये बिल दिले जाईल. त्यामुळे काम थांबणार नाही. जॅकवेलचे काम मे २0२0 अखेर पूर्ण होईल. ५२ किलोमीटर पैकी केवळ ५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे बाकी आहे. ही सर्व कामे पुढील वर्षाअखेरीस पूर्ण होऊन कोल्हापूरकरांना थेटपाईपलाईनने पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.- सुरेश कुलकर्णी, मनपा जलअभियंता‘पाटबंधारे’च्या निर्णयावर थेट पाईपलाईनचे भवितव्ययंदा मुसळधार झालेल्या पवासामुळे काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परतीच्या पावसामुळेही धरणाची पातळी कायम आहे. त्यामुळे जॅकवेल पाण्यामध्ये आहे. धरणाची पातळी कमी झाल्याशिवाय येथील कामाला सुरुवात करता येत नाही. या वर्षी येथील कामाला अवधी कमी मिळणार आहे. त्यामुळे राधानगरी धरणाऐवजी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्राधान्य द्यावे, अशा विनंतीचे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला दिले आहे. २0२0 मध्येही शहराला थेटपाईपलाईने पाणीपुरवठा होईल, याची शाश्वती नाही.रखडलेलीकामेधरण क्षेत्रातील जॅकवेल. सोळांकू र, नरतवडे, कपिलेश्वर येथील ५ कि.मी. अंतराची पाईपलाईन. पुईखडीतील जलशुद्धीकरणात सप्लाय पाईपलाईन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका