शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग: एकाच वेळी उच्च न्यायालयात याचिका करा, विनामूल्य सल्ला देईन; निवृत्त न्यायाधीशांनी शेतकऱ्यांना दिले आश्वासन

By संदीप आडनाईक | Updated: March 26, 2024 19:13 IST

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गात जमीन घरे खासगी मालमत्ता जाणाऱ्या अनेक बाधितांनी शाहू स्मारक भवनात झालेल्या जनसुनावणीमध्ये आपल्या अनेक समस्यांना ...

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गात जमीन घरे खासगी मालमत्ता जाणाऱ्या अनेक बाधितांनी शाहू स्मारक भवनात झालेल्या जनसुनावणीमध्ये आपल्या अनेक समस्यांना वाचा फोडली. यावेळी १५६ शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आणि कैफियती तोंडी आणि लेखी स्वरुपात समितीसमोर सादर केल्या. एकाच वेळी शेतकऱ्यांनी उठाव करुन लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, मी त्यासाठी विनामूल्य सल्ला देईन असे आश्वासन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी. व्ही. नलवडे यांनी दिले.अखिल भारतीय किसान सभेने शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने मंगळवारी नलवडे यांच्या अध्यक्षतेखालील प्राचार्य टी. एस. पाटील आणि डॉ. बी. एम हिर्डेकर यांच्या त्रिसदस्यीय तज्ञ समितीपुढे ही जनसुनावणी घेण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती, अडचणी, व्यथा एकत्रित करुन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल अंतिम झाल्यावर प्रकाशित करण्यात येणार आहे.अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष उदय नारकर यांनी प्रास्तविक केले. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, गोवा याठिकाणी अनेक रस्ते झालेले आहेत, आता नव्या महामार्गाची आवश्यकता नाही. हा रस्तेप्रकल्प घातक आहे. शेती, पर्यावरण आणि जैवविविधता वाचवा असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.

आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई,अंबरिश घाटगे यांनी या प्रकल्पाला आमचा विरोधच राहिल असे जाहीर केले. अतिग्रे येथील संजय सूर्यवंशी, जयसिंग मुसळे या शेतकऱ्यांनीही कैफियत मांडली. सीटूचे सचिव सुभाष जाधव, शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील, योगेश कुळवमोडे आदींनीही विचार मांडले. अमोल नाईक यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग