शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जयंत आसगावकर यांच्या विद्यापीठातील सभेवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 10:59 IST

Pune, kolhapur, Education Sector, Teacher पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे प्रचारानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागात गेले होते. यावेळी त्यांनी या विभागातच प्रचारसभा घेतल्याबद्दल काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी याबाबत विचारणा करणारे पत्र हे विद्यापीठ प्रशासनाला पाठविले आहे.

ठळक मुद्देजयंत आसगावकर यांच्या विद्यापीठातील सभेवर आक्षेप व्यवस्थापन परिषद सदस्यांकडून विचारणा : प्रशासनाला पत्र

कोल्हापूर : पुणेशिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर हे प्रचारानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागात गेले होते. यावेळी त्यांनी या विभागातच प्रचारसभा घेतल्याबद्दल काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी याबाबत विचारणा करणारे पत्र हे विद्यापीठ प्रशासनाला पाठविले आहे.विद्यापीठ कॅम्पसवर कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते. त्यामुळे या सभेसाठी पूर्वपरवानगी घेतली होती का? निवडणुकीतील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराची सभा कशी काय घेतली जाते? असे आक्षेप व्यवस्थापन परिषदेच्या संबंधित सदस्यांनी नोंदविले आहेत. गेल्या आठवड्यात विद्यापीठातील या अधिविभागात आसगावकर हे प्रचारासाठी आले होते. त्यासाठी या विभागातील काही प्राध्यापकांसह विभागप्रमुखदेखील उपस्थित होते.

अशा स्वरूपातील सभाही विद्यापीठाचे संकेत मोडणारी आहे. त्यामुळे त्याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्वरूपातील प्रचारसभा झाली आहे का?, त्यासाठी पूर्वपरवानगी घेतली होती का?, आदींबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा करण्याबाबतचे पत्र व्हॉटसॲपद्वारे पाठविले आहे. त्याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, याबाबत रसायनशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. जी. एस. गोकावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार आसगावकर हे प्रचारानिमित्त अधिविभागातील प्राध्यापकांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची प्रचारसभा अथवा मेळावा झालेला नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकShivaji Universityशिवाजी विद्यापीठ