शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणास कारणीभूत कोल्हापुरातील २४ उद्योगांना नोटीसा, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 13:06 IST

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या ...

कोल्हापूर : पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या वाढते. एमआयडीसी परिसरात तर वर्षाचे १२ महिने ही समस्या असते. कोल्हापूर शहराच्या आसपासच्या परिसरात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित अशा तीन मोठ्या एमआयडीसी आहेत. या एमआयडीसींमध्ये विविध स्वरूपात प्रदूषण करणाऱ्या २४ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल-पंचतारांकित एमआयडीसींमध्ये उद्योगांची संख्या जास्त आहे. या तिन्ही एमआयडीसी परिसरात उपनगरांचीही संख्या मोठी असल्याने कंपन्यांमधून प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. या एमआयडीसींमध्ये फौंड्री उद्योगांसह विविध उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमुळे प्रदूषण होणार नाही याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार सूचना दिल्या जातात.मात्र, काही कंपन्या या सूचनांचे पालन करत नसल्याने महामंडळाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या सात महिन्यांत २४ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या तीन एमआयडीसींमधील ४ कंपन्यांना निर्देश दिले आहेत. तर ३ कंपन्यांना अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रदूषण करणाऱ्या ५ कंपन्यांसाठी प्रस्तावित आदेशही काढण्यात आले आहेत.दरम्यान, औद्योगिक वसाहतींमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून वारंवार विविध उपक्रम राबविले जातात. कंपन्यांमध्ये जनजागृती केली जाते. तरीही काही कंपन्यांकडून प्रदूषण होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नोटीस, पुढे काय?प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ज्या कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे अशा कंपन्यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी ठराविक मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी काय खुलासा केला आहे यावरून त्यावर कोणती कारवाई करायची हे ठरविले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण