शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

करवीर, आजरा मतदारसंघांबाबत राज्य निवडणूक आयोगाला नोटीस, कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:08 IST

तातडीच्या हस्तक्षेपालाही मान्यता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या गोकुळ शिरगाव, उचगाव, गडमुडशिंगी आणि आजरा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रचनेबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर मंगळवारी येथील सर्किट बेंचसमोर सुनावणी झाली. यावेळी याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढण्याचा निर्णय झाला. मतदारसंघ रचना लगेच अंतिम होणार असेल तर तातडीच्या हस्तक्षेपाची विनंतीही न्यायालयाने मान्य केली. दरम्यान, शुक्रवारी अंतिम आराखडा जाहीर होणार आहे.करवीर तालुका प्रारूप आराखड्याविषयी आक्षेप घेणाऱ्या चार याचिका १३ ऑगस्ट २५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. रावसाहेब पाटील गडमुडशिंगी, सचिन देशमुख उचगाव, शशिकांत खोत गोकुळ शिरगाव आणि संग्राम पाटील पाचगाव यांनी चार स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. ही प्रारूप रचना चुकीची असून, यामध्ये चुकीच्या पद्धतीने गावांची अदलाबदल केल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता.गांधीनगर ग्रामपंचायत फोडली असून, काही भाग उचगाव आणि काही भाग गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला आहे. नियमानुसार गणामध्ये अशी फोड केली तरी चालू शकते. परंतु, जिल्हा परिषदेला मात्र असे करणे नियमबाह्य आहे, असाही आक्षेप घेण्यात आला.

यावर सुनावणी होऊन या चारही याचिका एकत्रित करण्यात आल्या. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीसही काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, शुक्रवारी, २२ ऑगस्टला अंतिम रचना जाहीर होणार असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या याचिकाप्रकरणी तातडीचा हस्तक्षेप करण्यासही न्यायालयाने मान्यता दिली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्यासमोर ही सुनावणी झाली.या चार याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. ऋतुराज पवार आणि ॲड. श्रीकृष्ण गनबावले यांनी युक्तिवाद केला. आजरा मतदारसंघ रद्द केल्याप्रकरणी याचिकाकर्ते जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई यांच्यावतीने ॲड. अनिल अंतूरकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे युक्तिवाद केला. याही प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाला नोटीस काढण्यात आली.

गुरुवारी सुनावणीची शक्यताजरी न्यायालयाने ९ सप्टेंबरची पुढची तारीख दिली असली तरीही तातडीच्या हस्तक्षेपास मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा अंतिम आराखडा शुक्रवार, २२ ऑगस्टला जाहीर होणार आहे. त्यामुळे याबाबत २१ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.शुक्रवारी अंतिम आराखडाविभागीय आयुक्तांनी हरकतींपैकी केवळ आठ हरकती स्वीकारल्या होत्या. त्यानुसार दुरुस्ती करून पुन्हा हा आराखडा सोमवारी विभागीय आयुक्तांना सादर केला. तो मान्य झाल्यानंतर शुक्रवारी २२ ऑगस्टला अंतिम आराखडा जाहीर करण्यात येणार आहे.