जैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:01 IST2020-09-14T19:59:39+5:302020-09-14T20:01:34+5:30
जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

जैववैद्यकीय कचराप्रकरणी महापालिकेला नोटीस
कोल्हापूर : जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, लाईन बाजार येथील महापालिकेच्या जैववैद्यकीय कचरा प्रकल्प स्थळावर जैववैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर घातक प्रकारे साठवलेले आढळून आले आहे.
पावसाचे दिवस असल्याने जैववैद्यकीय कचऱ्यावर पाणी पडत असल्याने त्याचं लीचेट होण्याची शक्यता आहे. जे वादळाच्या पाण्याने सुविधेच्या परिसराच्या बाहेरच्या भागाकडे जाऊ शकते. ज्यामुळे विषाणूच्या प्रसार होण्याचा धोका आहे.
''प्रदूषण मंडळा''ने उपस्थित केलेले प्रश्न
- जैववैद्यकीय कचरा साठवणूक, वाहतूक व हाताळणी बाबतच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.
- प्रकल्पातील कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली नाहीत.
- जैववैद्यकीय कचरा ज्या वाहनातून मुंबई येथे पाठवला याबाबत कोणत्याही नोंदी आढळून आलेल्या नाहीत.
- जैव वैद्यकीय कचरा नियमांचे पालन आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास गंभीर नाही.
- सुविधेचा चुकीचा वापर करून मानवी आरोग्यावर आणि आसपासच्या वातावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई का सुरू केली जाऊ नये. याबाबत सात दिवसात खुलासा देण्यात यावा असेही प्रदूषणाने म्हटले आहे.