जिल्ह्यातील ७३६ समाजकंटकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:42+5:302020-12-15T04:40:42+5:30
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतीच्या दि. १५ जानेवारी २०२१ रोजी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने गुन्हेगारांच्या कारवाईवर वॉच ...

जिल्ह्यातील ७३६ समाजकंटकांना नोटिसा
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतीच्या दि. १५ जानेवारी २०२१ रोजी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने गुन्हेगारांच्या कारवाईवर वॉच ठेवला आहे. जिल्ह्यातील रेकॉंर्डवरील गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. पुढील दोन दिवसांत ही गुन्हेगारांची अपडेट माहिती घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होत असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत समाजकंटकांकडून कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांसह गुन्हेगारांवर करवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखविण्यांसह इतर गैरप्रकार सुरू असल्यास त्याची माहिती तातडीने पोलीस खात्यास तातडीने कळवावी, असेही आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.
नव्या ‘शक्ती’कायद्यामुळे निर्भया पथके अधिक कार्यक्षम
महिलां अत्याचारविरोधी नव्याने ‘शक्ती’ कायदा विधानसभेत सादर झाला आहे. त्या अनुषंगाने पीडित महिलेला जलदगतीने न्याय मिळणार आहे. न्यायालयात दोषारोपपत्र २१ दिवसांत दाखल करण्याची तर न्याय देण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी असल्याने तपास वेळेत होऊन साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाणही घटणार आहे. नव्या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सहा निर्भया पथके अधिक कार्यक्षमपणे कार्यरत होणार आहेत. शक्ती कायदा अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रबोधन करण्यात येणार आहे, तसेच निर्भया पथकांमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे, असेही पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले.
फोटो नं. १४१२२०२०-कोल-शैलेश बलकवडे(डीएसपी)
(तानाजी)