शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना नोटिसापिण्याच्या पाण्याबाबत दक्षता न घेतल्याचा परिणाम

कोल्हापूर : पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, भूजल सर्वेक्षणचे ऋषिकेश गोसकी हे यावेळी उपस्थित होते.आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्वच गावांच्या पिण्याच्या पाण्याची उद्भवस्थाने तपासली जातात. पाण्याचे शुद्धिकरण, उद्भवस्थानांची स्वच्छता, गळती या सर्वांची पाहणी करण्यात येते. यानंतर या ग्रामपंचायतींसाठी लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाते.

या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्भवस्थानांनजीक अस्वच्छता, गळती असल्याचे निदर्शनास आले होते. अशा गावांना पिवळे कार्ड देण्यात आले होते. यातील आजरा, गवसे, इटे, चाफवडे, चितळे (ता. आजरा), कोदाळी, वाघोत्रे (ता. चंदगड),कातळी (ता. गगनबावडा), चिखली, बेलेवाडी काळम्मा, बेलवळे खुर्द (ता. कागल) आणि यवलूज (ता. पन्हाळा) या १२ ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या सुधारणा केल्याने त्यांना पुन्हा हिरवे कार्ड देण्यात आले.मात्र उर्वरित ४८ ग्रामपंचायतींनी काय सुधारणा केल्या, काय उपाययोजना केली याची माहितीच जिल्हा परिषदेकडे न दिल्याने अखेर या सर्व ग्रामपंचायतींना नोटिसा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामपंचायतींना सुधारणा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर