झेंडा न फडकवणे ही भावनांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:26+5:302021-02-05T07:12:26+5:30
कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकवण्यावेळी अनेकांनी चमकोगिरी करून घेतली. मात्र, त्यानंतर बहुतांश वेळा ...

झेंडा न फडकवणे ही भावनांची अवहेलना
कोल्हापूर : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकवण्यावेळी अनेकांनी चमकोगिरी करून घेतली. मात्र, त्यानंतर बहुतांश वेळा तिरंगा ध्वज फडकवला जात नाही. जर महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन आणि संबंधित खासगी संस्थेला हे काम जमणार नसेल तर २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्टला ध्वज फडकवण्याची जबाबदारी प्रजासत्ताक संस्थेकडे द्यावीए अशी मागणी या संस्थेचे प्रमुख दिलीप देसाई यांनी केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा ध्वज फडकणार की नाही असा प्रश्न दोनच दिवसांपूर्वी लोकमतने उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया म्हणून दिलीप देसाई यांनी याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना ही निवेदने मेलव्दारे पाठवली आहेत.