शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 6:19 AM

संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढावे, ही फडणवीस यांची खेळी

कोल्हापूर : छत्रपती घराण्याला सर्वच पक्ष सन्मान देतात. त्यामुळे संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अवमान झाला, असे म्हणता येणार नाही, असे शाहू छत्रपती यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केले. संभाजीराजेंी निवडणूक अपक्ष लढवावी, ही भाजप आणि त्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका, त्यावरून सुरू असलेली चर्चा यासंबंधी शाहू छत्रपती यांनी सडेतोडपणे भूमिका मांडली. ते म्हणाले की, संभाजीराजे यांच्या खासदारकीची मुदत ३ मे रोजी संपल्यावर त्यांनी फडणवीस यांची अर्धा तास भेट घेतली. त्यात काय चर्चा झाली, हे समजले नाही. नंतर लगेच संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढण्याची व राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली.

तुम्ही संघटना व पुढे तो राजकीय पक्ष करणार होता, तर मग तुम्हाला राज्यसभेची गरज नव्हती. तुम्हाला राज्यसभा हवी होती, अपक्ष लढायचे होते तर मग फडणवीस यांच्याइतकेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते व त्यांची संमतीही महत्त्वाची होती. कदाचित त्यातून हे गणित जमलेही असते. त्यांना न भेटता, विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवारी जाहीर केली. तुम्हाला वाटले की, मी अपक्ष म्हणून लढणार, असे जाहीर केल्यावर महाराष्ट्रातील सारे पक्ष पाठिंबा जाहीर करायला माझ्या मागून पळत येतील. परंतु, तिथेच त्यांचे गणित चुकले. कदाचित ‘तुम्ही अपक्ष लढा, आम्ही पाठिंबा देतो’, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सुचविले असेल. 

शब्द फिरवला म्हणणे चुकीचे

संभाजीराजे आता मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, असे म्हणत आहेत. तेदेखील चुकीचेच आहे. शिवसेनेसोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्या, असे त्यास म्हणता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी सत्य तेच बोललो : संभाजीराजे छत्रपती

मी सत्य तेच बोललो आहे. माझे वडील शाहू छत्रपती यांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असेही त्यांनी असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा