शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : ​​​​​चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:07 IST

BJP , Uddhav Thackeray, Maratha Reservation, chandrakant patil, kolhapurnews हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.याचा त्यांनी यावेळी निषेधही केला.

ठळक मुद्देहे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : ​​​​​चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका मराठा आरक्षणाबाबत गांर्भिय नसल्याने सरकारचा निषेध

कोल्हापूर : ​​​​​हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मराठा आरक्षणापासून महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार पहिल्या दिवसापासून पळ काढत असल्याचा आरोप  यावेळी पाटील यांनी केला. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होती. त्यामध्ये पुढची तारीख पडल्यानंतर कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेधही केला.

दसऱ्यादिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, हे त्यांचे दसऱ्याचे भाषण नव्हते तर ते शिमग्याचे भाषण होते. सत्तेवर आल्यानंतर काही कामच केले नाही तर ते सांगणार काय ? त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा सन्मान ठेवला नाही. त्यामुळे मग शेण, गोमूत्र, काळ्या टोपीखालील डोके यावर ते बोलले. मात्र शेतकरी, महापूर, अतिवृष्टी, कर्जमाफी याबाबत ते काहीही बोलले नाहीत.पाटील म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाबाबतचा प्रकार पाहिल्यानंतर हे सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणापासून पळ काढत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज दोन नंबरला केस होती. ती पुकारली तेव्हा त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

न्यायाधीशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली; परंतु प्रश्नाचे महत्त्व ओळखून त्यांनी नंतर पुन्हा सुनावणी घेतली. यावेळी शासनाने चार आठवड्यांची मुदत मागितली आणि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही याचिका चालावी, अशी इच्छा प्रदर्शित केली. मात्र, यासाठीची जी पूर्वतयारी करणे गरजेची होती ती अजिबात नव्हती.

संबंधित मंत्री, ॲडव्होकेट जनरल, त्यांना इनपूट देणारे आणखी काही तज्ज्ञ वकील, या क्षेत्रांतील जाणकार यातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आता चार आठवडे पुन्हा सारे शांत होणार आहे. आता जो युक्तिवाद होईल तो पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रवेश, विविध परीक्षा, नोकरी भरती सर्व काही ठप्प होणार आहे. आम्ही एवढी ताकद लावली होती की १ वर्ष सर्वोच्च न्यायालयातील केस चालवली असे ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण