शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तर’ विधानसभा पोटनिवडणूक: भाजप येत्या बुधवारी अधिकृत उमेदवार जाहीर करणार; सहाजणांच्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 17:13 IST

आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार

कोल्हापूर : ‘उत्तर’ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पोटनिवडणुकीसाठी १२ एप्रिल रोजी  मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. भाजपने ही पोटनिवडणूक लढण्याचे निश्चित केल्याने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचा उमेदवार येत्या बुधवारी जाहीर केला जाईल अशी माहिती माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.येथील एका हॉटेलवर आज, सोमवारी सकाळपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या दरम्यान हाळवणकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, माणिक पाटील चुयेकर, दौलत देसाई, सचिन तोडकर यांनी मुलाखती दिल्या.पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी या मुलाखती घेतल्या.हाळवणकर म्हणाले, आज इच्छुकांच्या मुलाखती घेवून आजच याबाबतचा अहवाल प्रदेशकडे पाठवण्यात येईल. यानंतर तो दिल्लीला पाठवण्यात येईल. तेथे उमेदवार निश्चित करून तेथूनच उमेदवारीची घोषणा करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा