शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे स्थलांतर नको, काँग्रेस आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 11:58 IST

कोल्हापूर : येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे; परंतु, हे कार्यालय स्थलांतरित ...

कोल्हापूर : येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे; परंतु, हे कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले आहे.आमदार पी.एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ व विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यापार उद्योग, व्यवसाय व शिक्षण याबाबतीत कोल्हापूर महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूरमध्ये विशेष पोलिस महानिरीक्षकांचे कार्यालय कार्यरत आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना हे जवळच्या अंतरावर व सोयीचे आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखाच्या आसपास असून कर्नाटक, गोवा राज्य व कोकण विभागाला कोल्हापूर जिल्हा जोडला जात असल्याने कोल्हापुरात पोलिस आयुक्तालयाची मागणी सातत्याने होत आहे. असे असतानाच आमदार राहुल कूल यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याबाबत मागणी केली असल्याचे समजते, ती चुकीची आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस