शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

'पेन्शन नाही..तोपर्यंत भाजपला मतदान नाही'; देशभरात पेन्शनधारक किती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:21 IST

२०२३ च्या अर्थसंकल्पामध्येही काही तरतूद नाही.

कोल्हापूर: गेली १२ वर्षे ईपीएस ९५ मधील निवृत्तीधारकांना प्रयत्न करूनही पेन्शनमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय पेन्शनधारकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्व श्रमिक संघाच्यावतीने ही बैठक घेण्यात आली.आंदोलनांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही पेन्शनवाढीसाठी निर्णय घेतलेला नाही. २०२३ च्या अर्थसंकल्पामध्येही काही तरतूद नाही. याबाबत कोल्हापूरच्या भविष्यनिर्वाह निधीकडूनही काहीच मार्गदर्शन केले जात नाही किंवा लेखी काही दिले जात नाही. त्यामुळे आता निर्णायक पाऊल उचलण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी संघटनेचे सहनिमंत्रक अतुल दिघे म्हणाले, देशभरात ७२ लाख तर कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ४० हजार पेन्शनधारक संघटनेचे सभासद असून आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार न करणाऱ्या भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला यापुढच्या काळात मतदान करायचे नाही, असा निर्धार आपण करूया.यावेळी संघटना सचिव अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, सुनील बारवाडे, गोपाळ पाटील यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपाPensionनिवृत्ती वेतन