शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक परवान्यांसाठी मुंबईला यायला लागू नये, उद्योजकांची मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:34 IST

कोल्हापूर : दैनंदिन परवाने आणि नूतनीकरण यासाठी उद्योजकांना मुंबईला फेऱ्या माराव्या लागू नयेत अशी अपेक्षा येथील विविध उद्योजकीय संस्थांच्या ...

कोल्हापूर : दैनंदिन परवाने आणि नूतनीकरण यासाठी उद्योजकांना मुंबईला फेऱ्या माराव्या लागू नयेत अशी अपेक्षा येथील विविध उद्योजकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे गुरुवारी केली. मुंडे यांनी या पदाधिकाऱ्यांशी शासकीय विश्रामगृहावर संवाद साधला. यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.औद्योगिक संस्था क्षेत्रातील ऑरेंज झोनमधील भूखंड रेडझाेनमध्ये टाकताना स्थानिक उद्योजकांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. दैनंदिन परवाने हे जिल्हा किंवा विभागीय पातळीवर मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंडे म्हणाल्या, राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींना मी भेट देणार आहे तेथील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करून तसेच उपक्रम राज्यात अन्य ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्योजकांनीही आपला उद्योग आणि व्यवसाय करताना पर्यावरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. यापुढच्या दौऱ्यात उद्योजकांच्या पर्यावरणीय प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून त्यातून प्रश्नांची सोडवणूक करण्यास प्राधान्य राहील.यावेळी झालेल्या चर्चेत स्मॅकचे उपाध्यक्ष भरत जाधव, मानद सचिव शेखर कुसाळे, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, सचिव शंतनु गायकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश चव्हाण, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक उपस्थित होते. यावेळी कागल हातकणंगले फाईव्ह स्टार सीईटीपी युजर इंडस्ट्रीज को. ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वस्त्रोद्योगाला १०० टक्के पाण्याचा पुर्नवापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुळातच हा उद्योग अडचणीत असताना या बंधनामुळे आणखी अडचणी वाढणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सतीश भुथडा, भैरू मुतगेकर, अरुण गोंदकर, कुंडलिक चौगले, प्रशांत रूईकर, सत्यबाबू हे यावेळी उपस्थित होते.

लावलेली झाडे तोडलीशासनाच्या शतकोटी वृक्षारोपण मोहिमेत उद्योजकांनी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. ही जाडे दहा, बारा फूट मोठी झाल्यानंतर ही झाडे लावलेला भूखंड एका उद्योगाला देण्यासाठी ही झाडे तोडण्यात आली. याच्या आम्हाला वेदना झाल्या. शासनाच्या या कारभाराचीही माहिती यावेळी पर्यावरणमंत्र्यांना देण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPankaja Mundeपंकजा मुंडे