शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:47 IST

कोल्हापुरात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची वार्षिक सभा

कोल्हापूर : सार्वजनिक जीवनात सर्वांत मोठा वाटा असलेल्या एसटीच्या खर्चात रोज तीन ते साडेतीन कोटीची तूट येत आहे. विविध प्रकारच्या सवलती जाहीर करून फक्त लोकप्रियता मिळविण्यासाठी एसटीचा वापर केला जात आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनात सरकारने एसटीसाठी एका पैशाचीही मदत केली नाही, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि भव्य कामगार मेळावा रविवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत पार पडला. त्यावेळी बरगे बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष शेखर कोठावळे होते.बरगे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली तेव्हापासून म्हणजे एप्रिल २०२०पासूनचा फरक देण्यासाठी सरकारला ३,१०० कोटींची गरज आहे. शिवाय १०० कोटींचा महागाई भत्ता प्रलंबित आहे. एसटीच्या ताफ्यात नवीन गाड्या येत नाहीत. तोवर स्पेअर पार्ट घ्यायला पुरेसा निधी उपलब्ध नाही. ८० टक्के गाड्या जुन्या, कालबाह्य आहेत. त्यांची वारंवार कामे निघत आहेत. परिणामी मार्गस्थ बिघाड वाढत असून, त्याचा कर्मचारीवर्गावर ताण आहे.याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष शेखर कोठावळे, सुनील घोरपडे, अरविंद पाटील, राजेंद्र पाटील, आय्याज चौगुले, मारुती पुजारी, परवेझ मोमीन, उत्तम पाटील, अनिता पाटील, श्रीनिवास कुंभार उपस्थित होते.पदाधिकारी, वाहकांचा सत्कारविभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी चालक, वाहक, यांत्रिकी यांना सन्मानाने वागवावे, चालक - वाहकांच्या रजा तसेच कामगिरीबाबत महामंडळाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी सेवानिवृत्तीबद्दल सुहास घोरपडे आणि श्रीधर मंगलेकर या पदाधिकाऱ्यांचा तसेच चोरीस गेलेले चौदा तोळे सोने प्रवाशांना परत करून चोरीचा छडा लावल्याबद्दल वाहक विजया राजू क्षत्रिय आणि वंदना संतोष क्षीरसागर यांचा बरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनstate transportएसटी