शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

राजकारणासाठी चारची वॉर्ड रचना नकोच, सतेज पाटील यांची विधानपरिषदेत सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:21 IST

चार विधानसभा एकत्र करू या का..

कोल्हापूर : महापालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या तीन वरून चार करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - २०२४ हे प्रशासकीयदृष्ट्या अव्यवहार्य आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसून नगरपालिका - महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विधेयक घाई-गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, केवळ राजकारणासाठी चारची वाॅर्ड रचना नको, अशी सूचना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.विधान परिषदेत सोमवारी महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक - २०२४ मांडण्यात आले. चर्चेत भाग घेताना आमदार पाटील म्हणाले, महापालिका, नगरपालिकांबाबत राजकीयदृष्ट्या आम्ही किती वर्ष खेळ करणार आहोत हा निर्णय आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आत्तापर्यंतच्या व्यवस्थेत एक वॉर्ड निर्णयाप्रमाणे कारभार यशस्वीरीत्या चाललेला आहे.राज्यात एक लाख १५ हजार कोटी रुपयांचे बजेट प्रशासकांच्या ताब्यात आहे. १४, १५ वा वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करायचा याच्यावर निर्णय होत नाही. खेळखंडोबा सुरू असून याचा लोकांना त्रास होणार आहे. एक नगरसेवक असेल तर त्याच्यावर दायित्व असते. चार नगरसेवक झाल्यास त्या वॉर्डमधील माणसाने नेमके कोणाकडे जायचे ? कामासाठी कोणाला जबाबदार धरायचे ? अधिकाऱ्यांना कामासाठी कोणत्या नगरसेवकाने संपर्क करायचा? जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे असे प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे.

चार विधानसभा एकत्र करू या का..केवळ राजकारणासाठी वॉर्ड रचना बदलत राहिलो तर आपली नोंद इतिहासात या नगरपालिका महापालिकेचे नुकसान करणारे आमदार म्हणून होईल हे लक्षात ठेवा. आपण चार विधानसभा मतदारसंघ एकत्र करून निवडणूक लढवू शकतो का ? असा प्रश्नही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील