शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडावर कोणताही सण, उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:57 IST

कोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किल्ले विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन ...

कोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किल्ले विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन पोलिसांकडून काटेकोरपणे केले जाणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त विशाळगडावर तैनात केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.गतवर्षी किल्ले विशाळगडावर (ता. शाहूवाडी) अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झाले होते. गजापूर परिसरात तोडफोड झाली होती. न्यायालयाने गडावरील उरुसाला परवानगी दिल्यानंतर उत्सवाची तयारी सुरू झाली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन गडावर कोणताही सण, उत्सव साजरा करू देणार नाही, अशा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस प्रमुख गुप्ता यांनी गुरुवारी विशाळगडला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले, विशाळगड प्रकरणी गेल्या चार दिवसांपूर्वी न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात काही अटी आणि नियम घालून दिल्या आहेत. त्यानुसार काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. गुरुवारी विशाळगड सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यात सर्व विभागांचे अधिकारी होते. त्यात झालेल्या निर्णयानुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय झाला आहे.

हिंदुत्वाद्यांची बैठकहिंदुत्ववादी संघटनांची जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. त्या वेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी संघटनेला दिली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी सकल हिंदू समाजाचे बंडा साळुंखे म्हणाले, सर्व धर्मांनी कायद्यांच्या चौकटीत राहूनच सण, उत्सव साजरे करावेत. प्रत्येकाने कायद्याचा सन्मान करावा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस