शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटीवरून महाद्वारवर प्रवेश नाही, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह टेहळणी मनोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:12 IST

बंदोबस्ताचे नियोजन सुरू

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना यंदा पापाची तिकटीपासून बिनखांबी गणेश मंदिराकडे उलट्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश मिळणार नाही. मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिरापासून प्रवेश केल्यानंतर नागरिकांना पापाची तिकटी आणि गंगावेश चौकातच बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था पोलिसांकडून केली जात आहे. तसेच सुरक्षेसाठी मिरवणूक मार्गावर १८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सात ठिकाणी टेहळणी मनोरे तयार केले जात आहेत.गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची प्रचंड गर्दी असते. यात महिला आणि लहान मुलांचीही संख्या लक्षणीय असते. गर्दीमुळे मिरवणुकीत चेंगराचेंगरी, धक्काबुक्की होण्याचा धोका असतो. असे प्रसंग टाळण्यासाठी आणि नागरिकांना विनाअडथळा मिरवणूक पाहता यावी, यासाठी पोलिसांनी नागरिकांना एकमार्गी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार मिरजकर तिकटी आणि बिनखांबी गणेश मंदिरापासून नागरिकांना मिरवणुकीत प्रवेश मिळेल. त्यांना पापाची तिकटी आणि गंगावेश चौकातून बाहेर पडता येईल. पापाची तिकटी येथून उलट्या दिशेने बिनखांबी गणेश मंदिराकडे जाता येणार नाही, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

सुरक्षेसाठी उपाययोजनामिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून मिरवणूक मार्गात १८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. याशिवाय काही व्यावसायिकांच्या कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, गंगावेश आणि क्रशर चौक या सात ठिकाणी टेहळणी मनोरे उभे करण्याचे काम सुरू आहे.

बंदोबस्ताचे नियोजन सुरूकोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कोल्हापुरातील बंदोबस्तासाठी एक हजाराहून जास्त पोलिस आणि तितक्याच होमगार्डची आवश्यकता असते. याशिवाय शीघ्र कृती दल, दंगल काबू पथकाचे जवानही तैनात असतात. दोन दिवसांत बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी दिली.