शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- निवारा ट्रस्ट फसवणूक: अखेर भरत गाट स्वत:हून पोलिसात हजर, मुख्य सूत्रधार पूजा भोसले-जोशी अद्याप मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:54 IST

निवारा ट्रस्टवर पुण्यातही गुन्हा

कोल्हापूर : साडेचार ते सहा हजार रुपयांची ठेव पावती करून १८ महिन्यांत २६ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवणाऱ्या निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टचा वकील भरत श्रीपाल गाट (वय ५२, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) हा अखेर स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची बुधवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पूजा अजित भोसले-जोशी (रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूर) आणि राहुल रमेश भोसले (रा. उचगाव, ता. करवीर) हे दोघे अद्याप पसार आहेत. लोकमतने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले व त्याचा पाठपुरावा केला आहे.शाहूपुरी पोलिस ठाण्यात मे २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच निवारा ट्रस्टचे प्रमुख गायब झाले होते. शोध घेऊनही ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तीन संशयितांपैकी ॲड. भरत गाट याने सुरुवातीला दोन वेळा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ते दोन्ही अर्ज फेटाळल्यानंतर त्याने दोन वेळा उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथेही दिलासा मिळाला नाही. अखेर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने तो शनिवारी (दि. २५) स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. पावणेदोन वर्षे पसार असलेल्या संशयितास पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करीत आहेत.पूजा भोसले-जोशी गायबया गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पूजा भोसले-जोशी ही पोलिसांना चकमा देऊन गायब झाली आहे. राजारामपुरी आणि पुणे येथील तिच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला. मात्र, अद्याप ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिच्या अटकेसाठी शोधमोहीम राबवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वांनाच गंडापूजा भोसले-जोशी हिने या गुन्ह्यात गुंतवणूकदारांसह एजंट, ट्रस्टचे कर्मचारी, कायदेशीर सल्लागार, आयडीबीआय बँक अशा सर्वांनाच गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. तिच्या अटकेनंतर फसवणुकीचा आकडा स्पष्ट होईल.

  • तिघा संशयितांपैकी एकास अटक
  • सुमारे दीडशे जणांची फसवणूक
  • निवारा ट्रस्टवर पुण्यातही गुन्हा
  • रखडलेल्या तपासाला पुन्हा गती
  • तक्रारदारांच्या आशा पल्लवित
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस