निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:24+5:302021-01-24T04:11:24+5:30
निपाणी : निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाच्या आवारात ...

निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
निपाणी : निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या आशीर्वाद सांस्कृतिक भवन केंद्रात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहीजणांचा हिरमोड झाला, तर काहींना लॉटरी लागली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर लागलीच इच्छुक मोर्चेबांधणीला लागले आहेत.
असे आहे आरक्षण
पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष
कोडणी : एस सी महिला, सामान्य सौंदलगा - ओबीसी अ महिला, ओबीसी ब महिला, कोगनोळी : सामान्य महिला, ओबीसी ब, अकोळ : ओबीसी अ महिला, सामान्य, गळतगा : सामान्य महिला, ओबीसी अ महिला, भोज : ओबीसी अ, सामान्य महिला, मांगूर : ओबीसी ब महिला, सामान्य
, कारदगा: ओबीसी ब, ओबीसी अ महिला,
बेडकिहाळ : सामान्य महिला, एस सी महिला, कुरली : एस सी, सामान्य महिला, बेनाडी : एस सी महिला, ओबीसी अ, कुन्नर : सामान्य महिला, ओबीसी अ
, शिरदवाड : सामान्य, सामान्य, आडी : सामान्य, सामान्य महिला,
लखनापूर : एससी, सामान्य महिला,
मानकापूर : सामान्य महिला, सामान्य, यमगर्णी : ओबीसी अ, महिला एस सी, शिरगुप्पी : ओबीसी अ, एस सी महिला, जत्राट : सामान्य, सामान्य महिला, आप्पाचीवाडी : सामान्य महिला, एस सी, हुन्नरगी : एस सी महिला, ओबीसी अ,
शेंडूर : ओबीसी अ, सामान्य महिला,
ममदापूर : सामान्य, सामान्य महिला, बारवाड : सामान्य महिला, सामान्य, यरणाळ : सामान्य, ओबीसी अ महिला, ढोणेवाडी : ओबीसी अ, एस सी महिला, सिदनाळ : सामान्य, सामान्य